Friday, December 3, 2021

नगर:अखेर खंडणी मागणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराला अटक ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार असल्याचे भासवून राहुरीच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या देवळाली प्रवरा येथील इब्राहिम शेख या खंडणीखोरास राहुरी पोलिसांनी गजाआड केले.

या घटनेमुळे माहिती अधिकार व पत्रकारितेच्या नावावर ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तथाकथित लोकांमध्ये खळबळ उडाली. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी या प्रकरणी राहुरी पोलिसात फिर्याद दिली होती.

देवळाली प्रवरा येथील इब्राहिम शेख हा पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे भासवून तीन वर्षांपासून पैशाची मागणी करत ठोकळे व मंडल कृषी अधिकारी राहुल ढगे यांच्याकडून खंडणी वसूल करत होता.

मला महिन्याला दोन हजार रुपये द्या, नाही तर माहिती अधिकार तसेच कृषी विभागातील कारभाराची बातमी छापण्याची शेख याच्याकडून वारंवार धमकी दिली जात होती. त्यामुळे महेंद्र ठोकळे यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली.

गुरुवारी शेख याने कृषी अधिकारी ठोकळे यांच्याकडे तीन हजारांची मागणी केली. तडजोडी अंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. इब्राहिम शेख हा गुरुवारी दुपारी राहुरीच्या तालुका कृषी कार्यालयात जावून ठोकळे यांच्याकडून खंडणीची दोन हजार रुपये रक्कम रोख स्वरूपात घेतली.

या वेळी सापळा लावून बसलेल्या पोलिस नाईक विकास साळवे, रोहित पालवे, शशिकांत वाघमारे, रवींद्र कांबळे या पोलिस पथकाने झडप घालून शेख याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!