Friday, December 3, 2021

लाल कांदा तापलाः याठिकाणी क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल असणाऱ्या पावसाळी कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.अखेर लाल कांद्याच्या भावाने उच्चांकी सीमोल्लंघन करत नाशिक जिल्ह्यात क्विंटलमागे तब्बल 5151 रुपयांचा भाव पटकावला आहे.

त्यामुळे अतिवृष्टीने झोडपलेल्या आणि खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक पाहायला मिळत आहे.यावेळी उमराणे येथील शेतकरी रणजीत देवरे यांनी आणलेल्या कांद्याला क्विंटलमागे सर्वोच्च 5151 रुपयांचा भाव मिळाला. यावेळी शेतकरी देवरे यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अजून महिनाभर तरी लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कांद्याचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे या वर्षी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. त्याचा फटका लाल कांद्यालाही बसला. त्यामुळे बाजारात या कांद्याची आवक तशीही कमी आहे.

सध्या उमराणे बाजार समितीमध्ये या कांद्याची जवळपास एक हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. त्यात सर्वात जास्त भाव हा 5151 मिळाला असून, सर्वात कमी भाव 1100 रुपये इतका मिळाला आहे. तर सरासरी 2700 रुपयांनी कांद्याची विक्री झाल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या

तुफान पावसामुळे यंदा इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. खरिपासह या भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. मात्र, सध्या तरी लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू आले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!