Friday, December 3, 2021

विखे पाटील,अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार व मला चित्रपटात भूमिका द्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जामनेर येथे ‘हलगट’ या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे यांनाच थेट गळ घातली.झाले असे की  भाजप नेते गिरीश महाजन यांनी चक्क एका निर्मात्याला सिनेमात काम देण्याची गळच घातली.

बरं एकट्यासाठी सिनेमात काम मागतील ते महाजन कसले? महाजन यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखेपाटील यांनाही सिनेमात घेण्याची विनंती निर्मात्याला केली. तर तुमच्यासाठी तर इंग्रजी सिनेमाच बनवावा लागेल

असं सांगून निर्मात्यानेही महाजन यांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला.यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे यांनाच थेट गळ घातली. अजित पवार, सुधीर मुनगंट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी आता आमदारकीची सहा टर्म झाली आहे.

त्यामुळे उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी नाही दिली आणि आम्ही रिटायर झालो

तर भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असं महाजन म्हणाले.महाजन हे जामनेरमध्ये प्रसिद्ध होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे त्यांचा लोक संपर्क. कुणाचा अपघात झाला असेल तर धावून जाणे, कुणाच मृत्यू झाला असेल तर आधी त्या ठिकाणी पोहोचणे, जामनेरमध्ये

मोटारसायकलवरून फिर, चहाच्या टपरीवर चहा घेता घेता लोकांशी गप्पा मार, कट्ट्यावर बसून तरुणांशी गप्पा मार, जयंती, धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, तरुणांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरणे आदी कारणांमुळे ते जामनेरमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!