Saturday, November 27, 2021

बाळासाहेब थोरातांकडून मुख्यमंत्री ठाकरेंची पाठराखण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. याला भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. कॉंग्रेसनं मात्र मुख्यमंत्र्यांची भुमिका रास्त ठरवली आहे. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात

यांनी मुख्यमंत्र्यांची भुमिका रास्त असून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत असं वक्तव्य एका मराठी न्यूज टिव्हीशी बोलताना केलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात केंद्र सरकार हे भारताच्या संघराज्य पद्धतीवर हल्ला करत असून राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता.

याबाबत बाळासाहेब थोरात यांनी ही वस्तुस्थिती असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या विधानाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, “आपल्याला राज्यघटनेच्या बरोबर आपण चाललं पाहिजे. संघराज्य ही पद्धत आपण स्वीकारली आहे. केंद्राचे अधिकार राज्याचे अधिकार आहेत. परंतु आता सगळं वेगळं चाललंय.

लोकशाहीच्या विरोधात काम सुरू आहे. भाजपच्या विरोधात लोक एकत्र येण्यापेक्षा जनतेने एकत्र यायला हवं, आपल्याला एकत्र येऊन लढा द्यायला हवा असं आव्हान त्यांनी केलं.
तसेच भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांचे (भाजपचे) विचार आणि बाबासाहेबांचे विचार यात मूलभूत फरक आहे.

ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते, पुरोगामी चळवळीमध्ये नव्हते. ज्या मंथनातून राज्यघटना तयार झालेली आहे, समतेचा विचार आहे तिचा आणि भाजपचा दुरान्वयानेही संबंध नाही. आता फक्त ढोंग बोलण्याचं आहेत, मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्त आहे आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!