Wednesday, December 8, 2021

गादीवर झोपल्या-झोपल्या मिळतील 25 लाख रुपये

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पैसे कमवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करतोच? इतकं की पैशांसाठी काहींना घर सोडावं लागतं. मात्र, एक असा जॉबआहे ज्यात घरामध्येच आरामात गादीवर पडल्यापडल्या सुद्धा लाखो रुपये मिळतात. सुरुवातीला तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हो हे खरं आहे.

‘द सन’ च्या वृत्तानुसार, लक्झरी बेड कंपनी ‘क्राफ्टेड बेड्स’ ही मॅट्रेस टेस्टरची (Mattress Tester Job) नियुक्ती करत आहे. कंपनीने बनवलेल्या गाद्या कशा आहेत, त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, हे सांगण्याचे काम मॅट्रेस टेस्टरचे असणार आहे.

या नोकरीसाठी कंपनी वर्षाला 24,000 पौंड म्हणजेच जवळपास 25 लाख रुपये देणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक आठवड्यात उच्च दर्जाच्या गादीची चाचणी घ्यावी लागेल.कंपनीला असे वाटते की, त्यांच्या गाद्यांची खरेदी केल्यानंतर ग्राहकाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये.

त्यामुळे या गाद्या बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्या आरामदायी आहेत का, याची चाचणी केली जाणार आहे. यासाठी ‘ मॅट्रेस टेस्टर ‘ ची नियुक्ती केली जात आहे. या पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीला एका आठवड्यात 37.5 तास गादीवर पडून राहावे लागेल.

क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन म्हणाले, ‘ग्राहकांचे समाधान हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही ‘मॅट्रेस टेस्टर ‘ ची नियुक्त करीत आहोत, जेणेकरून गाद्याची गुणवत्ता कळू शकेल.’ डिलन पुढे म्हणाले, ‘या नोकरीसाठी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही, ते घरी राहूनच काम करू शकतात.

गाद्या त्यांच्या घरी पोहोचवल्या जातील. पण ही नोकरी मिळवण्यासाठी अर्जदाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्या म्हणजे अर्जदार हा ब्रिटनचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तो गादीची चाचणी करण्यास सक्षम असावा. याशिवाय, त्याच्याकडे उत्तम

संभाषण कौशल्य असावे, जेणेकरून गादीची चाचणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तो कंपनीला पाठवू शकेल.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!