Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील  राहुरी येथील सुहास सोनवणे या ४८ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवीली. सुहास सोनवणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी तसेच एक मतीमंद मुलगा असा परिवार आहे.

ते शेती व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सुमारे सहा ते सात महिन्यापूर्वी त्यांची पत्नी पुष्पा सोनवणे ह्या करोना बाधीत झाल्या होत्या. त्यांच्यावर राहुरी तसेच नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार केले.

त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी नऊ ते दहा लाख रूपये खर्च आला होता. या करोना महामारीतून पुष्पा सोनवणे ह्या बचावल्या मात्र सुहास सोनवणे यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला होता. घरची परिस्थिती बेताची व आर्थिक उत्पन्न कमी असल्याने सुहास सोनवणे

यांना कर्ज फेडणे मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीत ते तणावपूर्ण जिवन जगत होते. या तणावपूर्ण जिवनाला व कर्जाला कंटाळून त्यांचे अखेर टोकाचे पाऊल उचलले.आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरात छताला असलेल्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!