Friday, December 3, 2021

खा सूजय विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी खासदार विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगरमध्ये उपोषण करण्यात आले होते. त्यामध्ये विविध विषयांवरून विखे यांनी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका केली होती.

त्याला आज तनपुरे यांनी उत्तर दिले.राज्याचे ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वत:ची बॅलन्सशीट तपासण्यात व्यस्त असल्याने नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत नाहीत,’ अशी टीका नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती. त्यांना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज उत्तर दिले.

‘विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी आली आहे. कोणाची बॅलन्सशीट तपासायची असेल तर ते काम आम्हालाही येते,’ असा इशाराच तनपुरे यांनी दिला.

तनपुरे म्हणाले, ‘पालकमंत्री मुश्रीफ हे वैद्यकीय कारणामुळे जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. ते वयाने आणि अनुभावाने ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत, याचे तरी भान टीका करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते. आपली बॅलन्सशीट तपासली जाईल, या भीतीने आधीच काही लोक भाजपमध्ये गेले. हर्षवर्धन पाटील यांनी याची कबुली

देताना आपल्याला भाजपमध्ये आल्यापासून निवांत झोप लागते, असे नुकतेच म्हटले आहे. विखेही अशा निवांत झोप येणाऱ्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी त्यांना येत असावी.भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडविचाना तनपुरे म्हणाले, ‘भाजपचे हे उपोषण

निव्वळ स्टंटबाजी होती. सकाळी नाश्ता करून उपोषणाला आले आणि दुपारी जेवण करण्यासाठी घरी निघून गेले. हे कसले उपोषण? शेतकऱ्यांची काळजी होती तर निदान रात्रभर तरी उपाषणस्थळी बसायचे होते. आम्ही उन्हा-पावसात आंदोलने केली आहेत. मुळात भाजपच्या नेत्यांना उपोषणाची जास्तच हौस

असेल तर त्यांनी ते दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात करावे, म्हणजे शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई तरी मिळेल असे तनपुरे म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!