Friday, December 3, 2021

 तर अर्धा भारत अंधारात होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून कोळशाची मोठी कमतरता भासत आहे. चार दिवस पुरेल, पाच दिवसच पुरेल इतका कोळसा शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. कोळसा संपला तर नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागू शकतो.

देशातील १३७ कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांपैकी ७२ मध्ये ती दिवस, ५० कारखान्यांमध्ये चार दिवस आणि ३० मध्ये फक्त एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. सामान्य दिवसांमध्ये १७ दिवस पुरेल इतका कोळसा राखीव असतो.

जगात ३७ टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते, उर्वरित ६७ टक्के इतर मार्गाने तयार होते. यातील ५५ टक्के वीज एकट्या भारतात बनते.जगात दरवर्षी सरासरी १६,००० दशलक्ष टन कोळसा उत्पादित केला जातो. २०१९ मध्ये १६ हजार ७३१ दशलक्ष टन कोळसा तर २०२० मध्ये १५ हजार ७६७ दशलक्ष टन कोळसा

तयार करण्यात आला. यापैकी जवळपास ६० ते ६५ टक्के कोळसा फक्त वीज निर्मितीसाठी वापरण्यात आला आहे. भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक देश आहे. भारतात वर्षाला सरासरी ७६० दशलक्ष टन कोळसा उत्पादित होते. यातील जवळपास ७५ टक्के कोळसा वीज निर्मितीसाठी वापरला जातो.

मागच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये ७२ टक्के कोळसा वीजनिर्मितीवर खर्च झाला, हे विशेष…भारताकडे ३१९ अब्ज टन कोळसाजगभरात वर्ष २०१६ मध्ये कोळसा मोजला गेला होता. २५ टक्के नूतनीकरणक्षम संसाधने वीजनिर्मिती करण्यास सक्षमभारतात केवळ २५ टक्के वीज नूतनीकरणक्षम संसाधनांद्वारे तयार केली जाते.

तर १२ टक्के जलविद्युत प्रकल्पांद्वारे तयार होते. बहुतेक कोळसा सुमारे ५५ टक्के वीज निर्माण करतो. देशात २०२२ पर्यंत अक्षय ऊर्जेसाठी १,७५,००० मेगावॉटचे उद्दिष्ट ठेवले आहे. जे एकूण ३,८४,११५ मेगावॉट वीज निर्मितीच्या ४५ टक्के आहे.

हे साध्य करणे सद्या कठीण आहे. २०२० च्या अहवालानुसार केवळ २५ टक्के नूतनीकरणक्षम संसाधने वीजनिर्मिती करण्यास सक्षम आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!