Saturday, November 27, 2021

शिर्डीतील दर्शन व्यवस्थेत म्हत्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या जरी कमी होत असली तरी राहाता तालुक्यातील रूग्ण संख्या वाढत आहे. शिर्डी येथील श्री.साईबाबा मंदीर राहाता तालुक्यात येत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याठिकाणी

दर्शन व्यवस्थेत केलेले बदल तूर्तास कायम ठेवण्यात येत आहेत. अशी माहिती अहमदनगर चे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.

शिर्डी उपविभागातील कोरोना परिस्थितीचा आज, दि.१६ रोजी आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे व गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.

डॉ.भोसले म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिर्डी श्री.साईबाबा मंदिरात दर्शन ऑनलाईन करण्यात आले होते. तसेच प्रसादालय ही बंद ठेवण्यात आले होते. कोरोना रूग्णसंख्येचा आढावा घेऊन यात वेळोवेळी बदल करण्यात येणार होता. राहाता तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या पाहता भाविकांसाठी

तूर्तास दर्शन व्यवस्था ऑनलाईनच राहील. तसेच सर्वसामान्य भाविकांसाठी प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कायम ठेवला आहे.सध्या अहमदनगर मधील २१ खेड्यांमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे.

तर ८ गावांमध्ये कंटोन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. सावळी विहीर ते शिर्डी पर्यंत असलेल्या रस्त्यांची तात्काळ दूरूस्ती करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात येतील. असे डॉ.भोसले यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!