Friday, December 3, 2021

ना.शंकरराव गडाख यांनी पोटखराब्याच्या प्रश्नावर शेतकरी-अधिकाऱ्यांची घेतली बैठक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील सोनई येथे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे भेडसावत असणारा शेतजमीन पोटखराब्याच्या प्रश्नावर शेतकरी व शासकीय अधिकारी यांची बैठक घेतली.

शेतकऱ्यांनाचा शेतजमिनीच्या पोटखराब्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने सोडवला असून पोटखराबा क्षेत्राचा समावेश लागवडीलायक क्षेत्रात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
याबाबत नेवासाचे तहसीलदार सुराणा व भूमी अभिलेखचे अधिकारी

पवार यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना ना.गडाख यांनी दिल्या.या मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांनी त्यांना ७/१२ वर असलेल्या पोटखराब्याचे नोंदीमुळे येणाऱ्या अडचणी मांडल्या. उताऱ्यावर पोटखराबा असूनही त्या क्षेत्रात वर्षानुवर्षे पिके घेतली जातात. मात्र त्यासाठी बँकेकडून कर्ज मिळत नाही.

पिकाचे नुकसान झाल्यास त्याचा विमाही मिळत नाही.शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन शेतकऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव आपआपल्या गावच्या तलाठी कार्यालयात दाखल करावेत. पुढचे काम जरी किचकट असले तरी या कामाचा पाठपुरावा माझी यंत्रणा करेल. त्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला खर्च करण्याची गरज पडणार नाही.

दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या हातात दुरुस्त केलेले उतारे मिळतील असे आश्वासन ना.गडाख यांनी शेतकरी बांधवांना दिले.त्यासाठी तहसिलदार, भूमी अभिलेख कार्यालय व प्रांत ऑफिसने अशा प्रस्तावांवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मेळाव्यातच सूचना दिल्या.

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, नेवासा तालुका बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, अरुण सावंत, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, विक्रम चौधरी, रविंद्र शेरकर, कारभारी चेडे,

बंडू मुंगसे, पांडुरंग निपुंगे, नारायण लोखंडे, निलेश पाटील, भाऊसाहेब मोरे, सचिन साबळे, गोरख निकम यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!