Saturday, November 27, 2021

देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर होणाऱ्या आयटीच्या रेडमधून लक्षात येतय की, वसूलीचे सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि त्यातून अलर्ट घेतले जात आहेत की कोणाकडून किती वसूली करायची आहे. असा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

 नागपूरात येथे माध्यमांशी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यादरम्यान ईडीच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. या आरोपांना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्याचे प्रमुख म्हणून आयटी विभागाच्या रेडमधून सांगितलं आहे ते ऐकून तुम्हाला झोप यायला नको होती की राज्यात इतकी प्रचंड प्रमाणात दलाली चाललली आहे. दलाली आता या स्तरावर पोहचली आहे की,

काही मंत्र्यावरील आयटीच्या रेडमधून लक्षात येतय की, वसूलीचे सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि त्यातून अलर्ट घेतले जात आहेत की कोणाकडून किती वसूली करायची आहे. हे याठिकाणी जर चालतं असेल तर या महाराष्ट्रामध्ये ईडी सीबीआय येणारचं आहे. ईडी, सीबीआयचं भय कोणाला असेल

ज्यांनी काही केलं असेलं त्यांना भय असेल. अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.“ईडी, सीबीआयबाबत मुख्यमंत्री बोलले. ती का येते? ती आम्ही नाही आणली. कारण उद्धव ठाकरे ज्या सरकारचं नेतृत्व करतात ते राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे.

शेतकऱ्यांना मदत करताना यांच्याकडे पैसे नसतात. काहीतरी कारणं सांगत पाठ दाखवली जाते. बांधावर जात संपूर्ण कर्जमाफी देऊ अशी आश्वासन दिली जातात. यांनी जो भ्रष्टाचार चालवला आहे त्यामुळे ईडी, सीबीआय यांच्या धाडी पडत आहेत. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे,” अशीही टीका फडणवीस यांनी केली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!