Tuesday, November 30, 2021

आरोग्य विभागाची परीक्षा, वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र वितरणासही सुरुवात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गांतील विविध पदांसाठीच्या भरती परीक्षा सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अनुक्रमे २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहेत.

आरोग्य विभागाच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ या संवर्गातील साडेनऊ हजारांहून अधिक पदांची भरती या परीक्षांद्वारे होणार असून ती देणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ८ लाखांहून अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात होणारी ही परीक्षा काही अपरिहार्य तांत्रिक

कारणांमुळे परीक्षार्थींचे व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून पुढे ढकलण्यात आली होती. नुकतेच या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आणि तांत्रिक व अन्य त्रुटी दूर करून ही परीक्षा आता २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

यातील ‘गट क’ संवर्गासाठीची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी दोन सत्रांमध्ये पार पडेल, तर ‘गट ड’ संवर्गासाठीची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी एकाच सत्रात घेतली जाईल. राज्यभरातील १ हजाराहून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा राज्य शासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक

तत्त्वांचे आणि करोनाविषयक नियमांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पडेल. परीक्षार्थींना प्रवेश पत्र वितरीत करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याद्वारे त्यांना नेमून देण्यात आलेले परीक्षा केंद्र आणि अन्य आवश्यक माहिती देण्यात येत आहे.

आरोग्य विभागासारख्या महत्त्वाच्या आणि करोनाकाळात अतिभार असलेल्या शासनविभागात या परीक्षांच्या माध्यमातून होणारी पदभरती ही आश्वासक बाब आहे. परंतु राज्यातील काही व्यक्ती आणि संघटना जाणीवपूर्वक या परीक्षा प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी खोटे आणि निराधार आरोप करून

परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. एकाच परीक्षार्थीला दोन सत्रांसाठी दोन स्वतंत्र परीक्षा केंद्रे दिल्याचा आरोप करत प्रवेशपत्रांबाबत चुकीची माहिती देऊन परीक्षा प्रक्रियेविषयी गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे सांगत या परीक्षांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘न्यासा कम्युनिकेशन’ने हे

आरोप फेटाळले असून परीक्षार्थींनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.या परीक्षांबद्दलच्या शासकीय परिपत्रकात नमूद नियमावलीनुसारच परीक्षार्थींना त्यांनी त्यांच्या अर्जात भरलेल्या माहितीनुसारच परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, असेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे.

नागपूर किंवा पुणे विभागातील पदभरती परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना त्या विभागातीलच एखाद्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिले गेले असून विविध पदांसाठी स्वतंत्र अर्ज केलेल्या परीक्षार्थींना स्वतंत्र परीक्षा केंद्रे दिली गेली आहेत, असेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!