Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात कांदा घसरला ;जाणून घ्या दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी कांद्याच्या भावात बुधवारच्या तुलनेत 400 रुपयांनी घट झाली. शनिवारी जास्तीत जास्त 3600 रुपयांपर्यंत भाव निघाले.

काल कांद्याची 30 हजार 16 गोण्या (16 हजार 809 क्विंटल) इतकी आवक झाली.बुधवारच्या तुलनेत ती एक हजार गोण्यांनी कमी आहे.मोठ्या कलर पत्ती कांद्याला 3200 ते 3300 रुपये भाव मिळाला. मिडीयम सुपर कांद्याला 3000 ते 3100 रुपये,

गोल्टा कांद्याला 2500 ते 3000 रुपये, गोल्टी कांद्याला 2000 ते 2500 रुपये तर जोड कांद्याला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला. एक-दोन वक्कलला 3400 ते 3600 रुपयांपर्यंत भाव निघाला.

तसेच नगर येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची सुमारे 31 हजार गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 3600 रुपयांचा भाव मिळाला.

नेप्ती उपबाजार समितीत शनिवारी कांद्याच्या 31 हजार 472 कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कांद्याला सुमारे 3600 रुपयांचा भाव मिळाला आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव – एक नंबर कांदा : 2800 ते 3600, दोन नंबर कांदा :2000 ते 2800, तीन नंबर कांदा : 950 ते 2000, चार नंबर कांदा :300 ते 950.

लाल कांद्याच्या चार हजार 308 गोण्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याला सर्वाधिक भाव 1500 रुपयांचा मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव :एक नंबर कांदा :1000 ते 1500, दोन नंबर कांदा :500 ते 1000, तीन नंबर कांदा :300 ते 500, चार नंबर कांदा : 100 ते 300.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!