Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकींग:भुखंडाचे अमिष दाखवून बलात्कार :बाजारसमिती उपसभापतीचा पतीला अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषी उत्पन्न बाजार समितीचा भुखंड देण्याचे अमिष दाखवून महीलेवर अत्याचार करून (असा आरोप आहे) तो फरार झाला होता. त्यास अहमदनगर येथून अटक करण्यात आली.प्राथ.शिक्षक राजेंद्र विलास गर्जे (रा.पागोरी पिंपळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पिडीत महिलेच्या तक्रारीवरून 3 आक्टोबर 2021 रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. गुरुवारी नगर शहरात जिल्हा पोलिस प्रमुखांना खब-याने दिलेल्या माहीती वरुन राजेंद्र गर्जे याला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले व पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी कोल्हार येथील पिडीत महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती.या तक्रारीनुसार पाथर्डी बाजार समितीची भुखंड वाटपाबाबत एका वृत्तपत्रातील जाहीरात वाचून पिडीत महीलेने भुखंड मिळण्यासाठी बाजार समितीकडे अर्ज दाखल केला होता. अर्जावर दिलेल्या फोन नंबर वर पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीचा पती राजेंद्र विलास गर्जे यांने फोन केला.

माझी पत्नी बाजार समितीची उपसभापती आहे. तुला भुखंड पाहीजे असेल तर मला भेट असे सांगितले. महीला पाथर्डीत आली तेव्हा राजेंद्र गर्जे याने तिला 18 आँगस्ट 2021 रोजी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील अर्जुना लाँन्सजवळीत एका गाळ्यात उपसभापती बसलेल्या आहेत

तेथे जाऊ व समक्ष बोलु असे सांगुन पिडीत महिलेला तेथे जाण्यास सांगीतले. प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपसभापती अगर इतर कोणीही नव्हते.त्यांनंतर राजेंद्र गर्जे याने गाळ्याचे शटर बंद करुन तेथे पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी देत विविस्त्र करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत कोठे काही बोललीस तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.

त्यानंतर सदर महीला तिच्या घरी गेली.त्यानंतर पुन्हा राजेंद्र गर्जे 22 आँगस्ट 2021 रोजी सकाळी अकरा वाजता महीलेच्या घरी जाऊन तिच्या घरात तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.महीलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला.पतीने व नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर महीलेने पोलिसात तक्रार दिली होती

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!