Saturday, November 27, 2021

शिवाजी कर्डिलेंवर निशाणा;पाणी चोरणार्‍याकडून उपोषणाची नौटंकी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

थकीत वीज बिलामुळे बंद असणारी मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या तीन वेळा बैठक घेवून सुरू केली. योजना सुरू करण्यासाठी बोलविलेल्या बैठकीला योजनेतील बुर्‍हाणनगर आणि नागरदेवळे गावचे सरंपचांना बोलावले. पण ते आले नाही. तर दुसरीडे या पाणी योजनेतून पाणी चोरणारेच योजना बंद

पडल्यावर उपोषणाची नौटंकी करत असल्याची टीका ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली.मंत्री तनपुरे म्हणाले, भाजपच्या उपोषणात माजी आ. कर्डिले यांनी बंद असणार्‍या मिरी-तिसगाव योजनेचा उल्लेख केला होता. याबाबत माहिती देतांना मंत्री तनपुरे म्हणाले,

ही योजना माझ्या मतदारसंघात असून या योजनेतील बुर्‍हाणनगर हे कर्डिले यांचे गाव आहे. याच गावातील अमोल जाधव यांनी मिरी-तिसगाव योजनेतून पाणी चोरी करून ते शेतात वापरण्यात येत असल्याची तक्रार केली होती. चौकशीत त्यात तथ्यही आढळले होते.

दुसरीकडे वीज वितरणची थकबाकी वाढल्याने तीन वेळा या योजनेची वीज जोडणी तोडण्यात आली. यावर मार्ग काढण्यासाठी तीन वेळा योजनेतील गावच्या सरपंचांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला कर्डिले समर्थक बुर्‍हाणनगर आणि नागरदेवळेचे सरपंच आले नाहीत. असे ही तनपुरे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!