Monday, December 6, 2021

आरेरे..नगर जिल्ह्यातील घटना :देवीपुढे हवन सुरु असतानाच आला ह्रदय विकाराचा झटका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील सप्तश्रृंगी मंदिरात मागील 40 वर्षापासून सेवाकार्य करत असलेल्या माधव तुकाराम गिते (वय 81) यांचे नवरात्र काळात देवीपुढे हवन सुरु असताना ह्रदय विकाराचा जोरदार झटका बसल्याने मृत्यू झाला आहे.

धार्मिक क्षेत्रात मोठे काम केलेल्या माता सोनाई यांनी माधव गिते यांना पुत्र मानले होते. घरची परिस्थिती हलाकीची असली तरी गिते यांनी माळेवाडी (शिबलापूर, ता. संगमनेर) शिवारात कष्टातून माळरानावर नंदनवन फुलवत प्रगती साधली.

नुकत्याचं संपन्न झालेल्या नवरात्र उत्सवातील 7 व्या माळेला (बुधवार) होमहवन विधी सुरु असताना माधव गिते यांना ह्रदय विकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

माधव गिते हे निःस्वार्थ भावनेतून करत असलेल्या सेवा कार्यामुळे देवीच्या दारातच मृत्यू होण्याचे भाग्य त्यांना लाभल्याचे व सेवा फळाली आल्याची चर्चा आश्वी परिसरात सुरु असून कुटुंबियांनीही हिच भावना बोलून दाखवली आहे. दरम्यान माधव गिते यांच्या

पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातंवडे असा मोठा परिवार असून शिक्षक भाऊसाहेब गिते, भास्कर गिते, संतोष गिते यांचे ते वडील होत.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!