Wednesday, December 8, 2021

महाराष्ट्र:संतापजनक:तू वयात आलीस का बघायचंय, 45 वर्षीय नराधम बापाचा 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.

गेले काही महिने हा प्रकार सुरु होता, मात्र पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर नराधम बापाला वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली.नराधम बापाने मुलीचे कपडे काढून तिच्यासोबत जबरदस्तीने संभोग करण्याचा प्रयत्न केला. जर तू कोणाला सांगितलेस, तर मी तुला जीवे ठार मारेन, अशी धमकी देत बापाने

अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या लैंगिक अवयवांना वारंवार हात लावून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन बापाने केल्याचं समोर आलं आहे.दरम्यान दुसरीकडे, मुंब्र्यातील रशिद कंपाऊंड येथील भाड्याच्या घरात 44 वर्षीय नराधम आपली पत्नी आणि सहा वर्षीय सावत्र मुलीसोबत रहात होता.

मुलीची आई बाहेर जाताच नराधम सावत्र बाप पीडित मुलीला अमानुष मारहाण करुन तिच्या सर्वांगावर माचीस आणि मेणबत्तीचे चटके देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करायचा.पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही.

परंतु, या प्रकाराची माहिती परिसरातील स्त्रियांना कळताच त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली आणि घडत असलेला प्रकार विचारला. काही वेळाने धीर आल्याने चिमुकलीने आपला सावत्र बाप आपले कसे शोषण करत होता, याचा पाढाच वाचला.

कसा आपला नराधम सावत्र पिता माचीसचे चटके देत होता आणि आपल्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके देऊन बलात्कार करत होता याची माहिती दिली.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!