Tuesday, November 30, 2021

दिवाळी आधी आरोग्यमंत्री टोपेंनी दिली सर्वात मोठी बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आणि लसीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याने राज्य सरकारने मंदिरे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे.दसरा झाला आणि आता दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे.

यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोकं गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहे देखील उघडणार…या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांची संख्या वाढतेय का आणि त्याचे प्रमाण कसे आहे याचा अभ्यास करून कोविड निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री

स्तरावर निर्णय होऊ शकतो. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून दिवाळीनंतर कोरोना केसेस कमी राहिल्या तर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्कफोर्सच्या सल्ल्यानुसार उघडलेल्या सर्व क्षेत्रातील उपक्रमामध्ये सहभागी होता येईल, अशी

दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली आहे.ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्याव्यतिरिक्त, जे लोक विशिष्ट आरोग्य संबंधित समस्येने ग्रस्त आहेत, ज्यामुळे ते लस घेऊ शकत नाहीत, डॉक्टरांचं सर्टिफिकेट दाखवून ते लोकं सुद्धा सुविधांचा लाभ घेऊ शकतील.

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शॉपिंग मॉल आणि मंदिरं सुरू करण्यात आली आहे. पण, अजूनही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास नियम लागू होते. मात्र, आता 22 ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घेता येणार आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे टप्प्या-टप्प्याने सर्व लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहे. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृह सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आता बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!