भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीक्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साजरी करण्यात येणाऱया हनुमान जयंती निमित्त श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
हनुमान जयंती उत्सव नियोजनाची बैठक दि.१८ रोजी सांय.६ वाजता हनुमान मंदिर सभा मंडपात पार पडली.यावेळी बापूसाहेब नजन,गणेश कुलकर्णी देवा,डॉ.रजनीकांत पुंड,डॉ.लहानु मिसाळ,सुनील देशमुख,गणेश महाराज,शरद गव्हाणे, देवेंद्र काळे,शिवाजी फुलारी,संतोष मिसाळ,किशोर मिसाळ,वाल्मीक लिंगायत,बाबासाहेब गायकवाड,
भाऊसाहेब तागड,चांगदेव जगताप,संभाजी मिसाळ,रविंद्र डवले,बंडू अंदुरे, अर्जुन शिंदे,कल्याण मडके,संदीप मिसाळ,संदीप पाखरे,विश्वास कोकणे,शरद मिसाळ आदी उपस्थित होते.
श्री संत नागेबाबांच्या पावन भुमीत मंहत भास्करगिरीजी महाराज, गुरूवर्य मिराबाई महाराज मिरीकर ,
महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, महंत सुनिलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षी भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात भव्य हनुमान जयंती सोहळा होत असतो.या वर्षी दि. ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत जयंती उत्सव होत आहे.दि.२२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धर्मध्वजारोहण होणार आहे.
यावर्षी रामायनाचार्य नंदकिशोर महाराज नेवासेकर यांच्या सुमधुर वाणीतुन दरोरज सायंकाळी ६ ते ९ श्रीरामकथा होणार आहे. दरोरज पहाटे ५ वाजता ध्यान-धारणा शिबिर होईल.दि.६ मार्च रोजी हनुमान जन्मोत्सवचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
हनुमान जयंती साठी श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट, ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळ, समता मल्टीस्टेट, सिद्धविनायक पतसंस्था,घुले पाटिल पतसंस्था यांचेसह पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळ, व्यापारी व हनुमान भक्त परिवार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
हनुमान मंदिर परिसर स्वच्छता , अन्नदान व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ,महिला भाविकांची सुरक्षा,लाईट व्यवस्था यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाने केले आहे.