Wednesday, December 8, 2021

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल मिडियावर अशा अनेक खोट्या किंवा दिशाभूल

करणाऱ्या बातम्या दिसून येतात, जे पाहून नक्की कशावर विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो. अलीकडे सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात लिहिले आहे की, केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना’ अंतर्गत बेरोजगारांना दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.

जर तुम्हालाही असा कोणताही व्हॉट्सअॅप मेसेज आला असेल, जर त्याला भुलू नका कारण हा संदेश खोटा आहे. या कोरोना साथीच्या काळात बेरोजगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उद्योगधंदे बंद पडले आहेत.

याच गोष्टीचा फायदा घेत या व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार ‘बेरोजगारांना आर्थिक मदत करत आहे.संदेशात असेही लिहिले आहे की, प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना 2021 साठी पूर्व नोंदणी सुरू आहे. पूर्व नोंदणी करण्यासाठी, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपला

फॉर्म भरा. यासाठी पात्रता 10 वी पास, वय 18 ते 40 असणे गरजेचे असल्याचेही नमूद केले आहे. 31 ऑक्टोबर 2021 ही अंतिम मुदत असल्याचेही म्हटले आहे.आता सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची चौकशी केली असता, हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले.

सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे तपासात उघड झाले आहे. पीआयबीने आपल्या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, अशा कोणत्याही संशयास्पद दुव्यांवर क्लिक करू नका, तो फसवणूक करण्याचा प्रयत्न असू शकतो.

दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!