Monday, December 6, 2021

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ट्विटद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’ असा टोलाही लगावला आहे.अतुल भातखळकर व्हिडिओत म्हणाले की, “सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागातील नोकर भरतीच्या वेळी जो गोंधळ राजेश टोपे यांनी घातला

तोच गोंधळ आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सेंटर्स 100 किमीच्या अंतरावर आहेत. टोपे साहेब आता या सर्व विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सोय करुन द्या. कारण पुण्याचा मनुष्य वाशिमला कसा जाणार आणि वाशिमला

परीक्षा दिलेला पुन्हा पुण्याला कसा जाणार? सगळा भ्रष्टाचार. सगळा गोंधळ पुढे ते म्हणाले की, “या आयटी कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करा, अशी मागणी आम्ही त्याच वेळेला केली होती. याचं आणि मंत्रीमंडळातील मंत्र्यांचं काय साटंलोटं आहे त्याचा तपास करा. पण नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री ठिम्म. आपल्या घरात बसून आहेत.

गेल्या वेळेच्या परीक्षेची नुकसान भरपाई विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. आता यावेळेची परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की या सरकारवर येणार आहे. त्यामुळे आता तरी राजेश टोपे यांना आरोग्यमंत्रीपदावरुन तात्काळ हकललं पाहिजे आणि या परीक्षा सुनियोजित पद्धतीने घेतल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.”

दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या दोन पेपरसाठी परीक्षार्थींना सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आलं आहे. यावरुनच भातखळकरांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!