Monday, December 6, 2021

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

वाळकी गावामध्ये एकाच गल्ली राहत असलेल्या लहान मुलांमध्ये सायकली लावण्यावरून सकाळीच किरकोळ वाद झाला होता. लहान मुलांमधील भांडणाचे लोण मोठयांच्या भांडणात पसरले. सकाळी दहा वाजता भांडण सुरू झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करत भांडण मिटविले होते. मात्र,

त्यानंतर दुपारी पुन्हा भांडण पेटले. जोरदार हाणामारी सुरू झाल्याने घोळक्‍यात एकटाच सापडलेला जावेद तांबोळी याने आपली जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत येथील सेंट्रल बॅंकेसमोर त्याच्या डोक्‍यात दगड टाकला. यात तो बेशुध्द पडला. त्यांना नगर रुग्णालयामध्ये

उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले.

कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!