Friday, December 3, 2021

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी आमदार विखेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

विखे पाटील पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोककंटाळलेले आहेत. मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री त्यात अडकलेला आहे. प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल. चौकशी सुरू आहे.

ते ईडी, सीबीआय वर आरोप करतील. वास्तविक पाहता या मंत्र्यांची सर्व पापे भरलेली आहेत. आपली पापे झाकण्यासाठी स्वायत्त संस्था असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्थांवर दोषारोप चालू आहे. कारण या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आपला भ्रष्टाचार लपविता येईल, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये.

हा माझा त्यांना सल्ला आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले यावर पत्रकारांनी मंत्री हा नवा आहे की जुना असे विचारले असता आमदार विखे पाटील म्हणाले, सध्या या प्रकरणावर सबुरीने घ्या म्हणजे लवकरच मंत्री नवीन आहे की जुने हे कळेल. कोणी किती ‘महसूल’ गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असेही आमदार विखे पाटील यांनी सूचित केले.

दरम्यान जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. यावर भाजपची भूमिका मांडताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, भाजप संपूर्ण ताकदीनिशी सर्व नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीरामपूर नगरपालिकाही आम्ही पूर्ण ताकदीने लढविणार आहोत, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!