Wednesday, December 8, 2021

विखे पाटलांचा थोरातांना टोला ? त्यांना व काँग्रेसला….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत श्रीरामपूर येथे 60 वर्षांवरील नागरिकांसाठी वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे एका कार्यक्रमात आ. विखे पा. यांचे नाव न घेता आरोप केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता विखे म्हणाले, त्यांना व काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किती किंमत आहे, हे लोकांनी पाहिले आहे.

त्यामुळे ज्यांना पक्षात व सरकारमध्ये किंमत नाही त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणार?राज्यातील महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले असून मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री त्यात अडकला आहे. त्यांचे प्रकरण ज्यावेळी बाहेर

येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल. याबाबत चौकशी सुरू आहे. वास्तविक पाहता आपली पापे झाकण्यासाठी स्वायत्त संस्था असलेल्या ईडी , सीबीआय सारख्या संस्थांवर दोषारोप चालू आहे. कारण या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आपला भ्रष्टाचार लपविता येईल, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये. असा माझा त्यांना सल्ला असल्याचे ते म्हणाले.

मंत्री हा नवा आहे की जुना असे पत्रकारांनी विचारले असता, सध्या या प्रकरणावर सबुरीने घ्या, म्हणजे लवकरच मंत्री नवीन आहे की जुने हे कळेल. कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असे त्यांनी सूचित केले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!