Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:मुंडकं कापलेलं धड विहिरीत सापडले; मुंडके अद्याप गायब

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे धांबोडी फाटा परिसरात एका ४५ वर्षीय व्यक्तीचे मुंडके नसलेले धड विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्षात आली.

याबाबत स्थानिक पोलीस पाटील यांनी अकोले पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भर पावसात विहिरीतून ते धड आणि मुंडके काढण्याचे काम सुरु होते. ही नायलॉन दोरीने केलेली आत्महत्या आहे की, घातपात.! याबाबत पोलिसांमध्ये साशंकता होती.

त्यामुळे, धड आणि मुंडकं पोष्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात आणल्यानंतर आता वैद्यकीय अहवालात याबाबत असणारे तर्क वितर्क व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. मात्र, दुपारी ३ वाजता मयत व्यक्तीचे धड बाहेर काढण्यात पोलिस व नागरिकांना यश आले. मात्र, विहिर खोल

असल्याने मुंडके तळाला गेल्याने ते अद्याप मिळून आले नव्हते. गोताखोराच्या माध्यमातून ते शोधण्याचे काम सुरु होते. या घटनेबाबत तुर्तास अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भाऊसाहेब दाजीबा तोरमल (वय ४५, रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले, जि. अ. नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान, घडला प्रकार स्थानिक नागरिकांनी पोलीस पाटील यांना सांगितला आणि त्यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी पाहिलेली परिस्थिती संदिग्ध असो वा नसो, त्यांनी घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे. मयत तोरमल यांचा

मृतदेह बाहेर काढला असून त्याचे नुकतेच धड पोलिसांच्या हाती आले आहे. शरिरात पाणी घुसल्यामुळे धड वरती तरंगले होते. मात्र, मयतचे मुंडके तळाला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे, ही आत्महत्या असो वा नको.! पंचनाम्यासाठी मुंडके शोधने पोलिसांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे, पंचक्रोशीतील काही व्यक्तींनी विहिरीत बुड्या घेऊन तळाला गेलेले मुंडके

शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रात्री उशिरापर्यंत अपयश आले होेते. त्यामुळे, आता मुंढी सकाळी शोधण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली. तर, जे काही धड सापडले होते. ते पोलिसांनी ताब्यात घेऊन अकोले ग्रामिण रुग्णालयात ठेवले आहे.

त्यामुळे, जोवर मुंढी सापडत नाही. तोवर ही आत्महत्या की घातपात यावर प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!