Wednesday, December 8, 2021

महाराष्ट्रात एक डोस घेतलेल्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटीकडे राज्य वाटचाल करत असून, दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकार निर्बंध शिथिल करत आहे.

राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये बऱ्याच गोष्टी सुरू केल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहं-नाट्यगृहं यासह इतरही सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्य सरकार आता एक लस घेतल्यांनाही सर्व ठिकाणी प्रवेश देण्याच्या आणि राज्यात संपूर्ण अनलॉक करण्याच्या विचारात आहेत. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे काय म्हणाले?

‘दिवाळीनंतर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही मॉल्स, लोकल रेल्वे तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना सामोरं जावं लागत

असलेल्या या असुविधेतून सुटका करण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना टोपे म्हणाले, ‘राज्यात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी

दुसऱ्या डोससाठी दिलेला आहे. त्यामुळं मोठं अंतर असल्यानं असुविधा होते. त्यामुळे आरोग्याविषयक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल’, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!