Wednesday, December 8, 2021

नगर विधानपरिषद:भाजपमधील एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करून विधान परिषद लढवणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या आठ जागांची मुदत संपणार आहे. याठिकाणी तत्पूर्वी निवडणूक होणार असल्याने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे.राज्यातील मुंबई शहर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, वाशिम, नागपूर आणि नगर जिल्ह्यातील

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदे जागेची मुदत 1 जानेवारी 2022 संपणार आहे. त्यापूर्वीच या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद सदस्यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू झाले आहे. नगरमधून विधान परिषदेवर

राष्ट्रवादीचे आ.अरुण जगताप यांना दोन वेळा संधी मिळालेली असून डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत त्यांना संधी मिळणार की महाविकास आघाडीकरून नवा चेहरा पुढे केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.नगरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र राज्यात सध्या महाविकास

आघाडीची सत्ता आहे. नव्या सत्तासमिकरणात काही बदल होणार का, याचीही चर्चा आहे. त्यामुळे ऐनवेळी ही जागा मित्र पक्षाकडे जाणार की राष्ट्रवादी आपला हक्क कायम ठेवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. ही निवडणूक आणि संभाव्य उमेदवारी याबाबत राजकीय आणि पक्षीय पातळीवर आतापर्यंत सर्वांनीच

तोंडावर बोट ठेरले आहे. दुसरीकडे आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी आतापासून काही नेत्यांनी पडद्याआड हालचाली सुरू केल्या आहे. या निवडणुकीत ‘मनी अ‍ॅण्ड मसल पावर’ चा प्रभाव अधिक जाणवत असतो. त्यामुळे या खेळात कोण उतरतो आणि लढतो, याकडे मतदार असणार्‍या सदस्यांचे विशेष लक्ष आहे.

जिल्ह्यातील पाच नगर परिषदांची मुदत संपत आली असून या ठिकाणी असणारे नगरसेवकांच्या मतदान पात्रतेचा मुद्दाही अद्याप स्पष्ट नाही.राष्ट्रवादीकडून काही नावांवर चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या गोटात मात्र शांतता आहे. भाजपमधील एक माजी आमदार हे राष्ट्रवादीत प्रवेश करून विधान परिषद

लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र, ही चर्चाही अद्याप जर-तर च्या फेर्‍यात अडकलेली आहे. भाजपकडून या निवडणुकीत राजकीय डाव टाकण्याची जबाबदारी खा.डॉ.सुजय विखे सांभाळणार की माजी मंत्री राम शिंदे याबाबतही स्पष्टता नाही.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!