Wednesday, December 8, 2021

सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यूएस बॉण्ड यिल्डमध्ये वाढ झाल्याने आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव वधारला आहे. आज सोने ०.२ टक्क्यांनी वधारून १७७०.२६ डॉलर प्रती औंस झाले. चांदीमध्ये देखील ०.२ टक्क्यांची वाढ झाली असून प्रती

औंस चांदीचा भाव २३.३४ डॉलर झाला आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. सप्टेंबरमध्ये विक्रीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली असल्याने बॉण्ड यिल्डमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.गेल्या आठवड्यात दसऱ्याच्या दिवशी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली होती.

सोने जवळपास ७०० रुपयांनी घसरले होते तर चांदीमध्ये ३०० रुपयांची घसरण झाली होती. आज दोन्ही मौल्यवान धातूंनी आठवड्याची सकारात्मक सुरुवात केली आहे. आज कमॉडिटी बाजारात सोने ९५ रुपयांनी तर चांदी २१९ रुपयांनी महागली आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७२९५ रुपये आहे. त्यात ८२ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोने ४७३१२ रुपयांपर्यंत वाढले होते. आज एक किलो चांदीचा भाव ६३४९० रुपये असून त्यात २१९ रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी सोने आणि चांदीला नफेखोरीची झळ बसली होती. सोन्याचा भाव ६६८ रुपयांनी कमी झाला आणि तो ४७२१४ रुपयांवर स्थिरावला होता. बाजार बंद होताना चांदीमध्ये देखील ३१५ रुपयांची घसरण झाली आणि चांदीचा भाव ६३२४० रुपयांवर स्थिरावला होता. तत्पूर्वी चार सत्रातील तेजीने सोने ४८ हजारांवर गेले होते.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०७० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८०७० रुपयांवर स्थिर आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३३० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०५४० रुपये इतका आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४६३० रुपये

तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८६९० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४३० रुपये इतका आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!