Monday, December 6, 2021

नगर ब्रेकिंग:बापानेच केला मुलाचा खुन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बापानेच स्वतःच्या ९ वर्षांच्या मुलाचा खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली आहे . याप्रकरणी नेवासा पोलिसांनी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे . नेवासा न्यायालयाने त्यास २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . दरम्यान , या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .

सदर खुनाचा प्रकार १३ ऑक्टोबरला घडला असून , गुन्हा मात्र १६ ऑक्टोबरला दाखल करण्यात आला आहे . सागर शंकर पवार असे खून झालेल्या मुलाचे , तर शंकर रामनाथ पवार असे आरोपीचे नाव आहे .याबाबत सविस्तर माहिती अशी की , नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ गोदावरी नदी परिसरात

राहणाऱ्या शंकर रामनाथ पवार याने अज्ञात कारणावरून आपला ९ वर्षांचा मुलगा सागर याला १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास हातापाय दोरीने बांधून काठीने बेदम मारहाण केली . या मारहाणीत सागर बेशुद्ध होऊन मयत झाला . त्यानंतर तो झाडावरून पडून बेशुद्ध झाल्याची

खोटी बतावणी करून त्याला नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले . त्यानंतर बापाने कोणालाही काही न सांगता परस्पर गोदावरी नदी परिसरातील जुन्या डाक बंगल्याजवळ खड्डा खोदून त्याचा दफनविधी करीत विल्हेवाट लावली .

दरम्यान , १३ तारखेला ही घटना झाल्यापासूनच प्रवरासंगम परिसरात या घटनेची चर्चा होत होती . नेवासा पोलिसांना याबाबत सुगावा लागला . पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दोन दिवस चौकशी केली . दोन साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेतला . प्रारंभी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली .

घटनेची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी १६ तारखेला प्रवरासंगम – टोका प्राथमिक आरोग्य अधिकारी सुरेंद्र पवार व शासकीय दफनविधी अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या घटनास्थळी जाऊन मयत सागरचा मृतदेह बाहेर काढला . पंचनामा करून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले . आरोग्य अधिकाऱ्यांनी मारहाणीत

सागरचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे . शनिवारी रात्री उशिरा सागरचा बाप शंकर रामनाथ पवार याला अटक करण्यात आली आहे . त्याच्या विरूद्ध पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाड यांच्या फिर्यादीवरून खुनासह परस्पर दफनविधी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . त्याला काल नेवासा

न्यायालयासमोर हजर केले असता २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . याबाबत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे तपास करीत आहेत .

ताज्या बातम्या

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...
error: Content is protected !!