Tuesday, November 30, 2021

असेल तर सतेवर राहाता कशाला ? विखे पाटलांचा आघाडी सरकारला सवाल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र सरकारने साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना साहाय्यक साधनांचे मोफत वितरण केले जाणार आहे. एकूण 26 साधनांचा यामध्ये समावेश

असून, हव्या असलेल्या साधनांकरिता नागरिकांचे तपासणी शिबिर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने जनसेवा फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्हा दिव्यांग विभागातर्फे श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील आघाडी सरकार सामान्य माणसाच्या हिताचा कोणताही निर्णय न करता सतेवर धिम्मपणे बसून आहे. सर्वकाही केंद्राने करावे हीच जर त्यांची अपेक्षा असेल तर सतेवर राहाता कशाला? असा सवाल आ. राधाकृष्ण विखे पा. यांनी केला.

यावेळी आ. विखे पा. यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली. राज्य सरकार मात्र कोणताही दिलासा देणारा निर्णय घेऊ शकलेले नाही. महाविकास आघाडी सरकार फक्त भ्रष्टाचारात अडकले आहे. मोठमोठ्या हॉटेलात आता सरकारच्या दलालांचे अर्थिक व्यवहार होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातील नागरिकांना समर्पित झाला आहे. केंद्र सरकारने मोफत कोव्हीड लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे देशातील 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करणारा देश म्हणून भारत ओळखला जाणार आहे.

82 कोटी लोकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्यामागे कोणताही नागरिक उपाशी राहू नये, हीच भूमिका होती असे विखे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!