Saturday, November 27, 2021

12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारी; भाजपच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: भाजपाचे नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केला.शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही, असं सांगताना महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात अ्सल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे.

भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केला. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार मजबूत आहे, पडणार नाही, असं का सांगत आहेत?, असा सवाल केला आहे.

शिवसेनेचे 12 आमदार पक्षात नाराज आहेत. त्याची काही उदाहरणं द्यायची म्हटली तर सुभाष साबणे, प्रताप सरनाईक अशी देता येतील. खूप लोकांना खूप काही बोलायचं आहे. पण त्यांना बोलता येत नाही. असेच सेनेचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.

तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात आहे. सरकारच्या पापाच्या घडा भरलाय. लवकरच तो फुटणार आहे, असा इशाराही त्यांना दिला.हे सरकार 100 पैकी 100 टक्के नापास आहे. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते वारंवार करतात.

पण सेनेचे 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना पक्षात फार मोठी खदखद आहे. नाराज सेना आमदारांना न्याय मिळत नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकासासाठी निधी मिळत नाही आणि विकास होत नाही”, असं लोणीकर म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!