Tuesday, November 30, 2021

नगर ब्रेकिंग:आज वाढले जिल्ह्यात कोरोनाचे इतके रुग्ण; जाणून घ्या आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ज्या गावात दहा पेक्षा जास्त कोरोना बाधित आहेत अशा गावात ग्रामीण लॉकडाऊन केला होता. याचा परिणाम हळु हळु दिसू लागला आहे.

आज सोमवारी जिल्ह्यात फक्त 163 कोरोना बाधित आढळले. यामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.काही दिवसापुर्वी संगमनेर, पारनेच्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आज पारनेर 13 तर संगमनेर 12 असे रुग्ण आढळल्याने

समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे नऊ ठिकाणही आकडेवारी दहा पेक्षा कमी असून सर्वाधिक असलेल्या राहुरीची आकडेवारी 21 वर आहे.आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीअहवालात 105 तर अँटीजेन चाचणीत 37 असे 163 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहुरी 21, राहाता 19, नगर ग्रामीण 17, कोपरगाव 14, नगर शहर 13, पारनेर 13, संगमनेर 12, इतर जिल्हा 9, पाथर्डी 9, श्रीगोंदा 8, नेवासा 7, शेवगाव 6, अकोले 5, जामखेड 4, कर्जत 3, श्रीरामपूर 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!