Friday, December 3, 2021

नगर ब्रेकिंग:तलावात होडी उलटून एकाचा बळी; तब्बल ७२ तासानंतर मृतदेह तरंगताना आढळून आला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तलावात मासेमारी करताना होडी उलटून मच्छिमार व त्याची पत्नी बुडाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा गावाअंतर्गत असलेल्या केळेवाडी येथे गुरुवारी रात्री घडली. या घटनेत पत्नी वाचली मात्र मच्छिमाराचा बुडून मृत्यू झाला.

तब्बल ७२ तास मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी तलावात तरंगताना आढळून आला.काशिनाथ आनंदा दुधवडे वय ४५ रा. कुरकुटवाडी ता. संगमनेर असे या मयत मच्छीमाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा रमेश दुधवडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु ची नोंद केली आहे.

केळेवाडी येथील तलावात संगमनेर तालुक्यातील बोटा येथील रज्जाक शेख यांनी मासेमारीसाठी लिलाव घेतला आहे. काशिनाथ व त्यांची पत्नी चीनकाबाई दुधवडे हे दोघे पती पत्नी शेख यांच्याकडे मासेमारीचे काम करीत होते. गुरवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते तलावात जाळे टाकण्यासाठी गेले असता होडी

 उलटल्याने हे दोघेही पाण्यात बुडाले. चीनकाबाई यांच्या हाती थर्माकाल चा पुठ्ठा लागल्याने त्याचा आधार घेऊन त्या तलावाच्या कडेला आल्या. मात्र काशिनाथ दुधवडे हे पाण्यात बुडाले. चीनकाबाईनी घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर तलावात बुडालेल्या काशिनाथ यांच्या बचावासाठी जीवरक्षक

पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानाही अपयश आले. तब्बल ७२ तासानंतर मृतदेह रविवारी सकाळी साडे आठ वाजता तरंगताना आढळून आला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!