Friday, December 3, 2021

जिओ च्या ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट; मोफत मिळणार 28 दिवसांचा प्लॅन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी भेट आणली आहे. कंपनीने एक ‘JioTogether’ हा रेफरल कोड लॉन्च केला आहे. याचा वापर नवीन Jio प्रीपेड कनेक्शनवर आणि Jio च्या सेवेवर पोर्ट केल्यानंतर वापरता येईल.

जिओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या ऑफर अंतर्गत, रेफर आणि रेफरर दोघांनाही 98 आणि 349 रुपयांचे मोफत रिचार्ज व्हाउचर दिले जातील. जिओ विविध ब्रँड्सचे 2,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त डिस्काउंट व्हाउचर देखील ऑफर करत आहे.

जास्तीत जास्त रेफरल मिळवण्यासाठी कंपनी ग्राहकांना प्रत्येक वेळी अधिक किंमतीचं व्हाऊचर देणार आहे. पहिल्या रेफरलवर कंपनी तुम्हाला 98 रुपयांचे मोफत रिचार्ज देईल, यामध्ये दररोज 1.5GB डेटा आणि 14 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर

करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या 12 व्या रेफरलवर कंपनी 349 रुपयांचे सहा व्हाउचर देणार आहे. प्रत्येक व्हाउचरमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा आणि 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे.

ही ऑफर 12 ऑक्टोबर 2021 पासून लाईव्ह आहे. जिओची ही ऑफर टप्प्याटप्प्याने आणली जात आहे. रिलायन्स जिओकडून पात्र ग्राहकांना एक व्हिडीओ पाठवला जात आहे. तुम्ही हा व्हिडीओ कोणत्याही व्यक्तीला पाठवू शकता. ज्यांना जिओचं नवं

कनेक्शन घ्यायचं आहे किंवा पोर्ट करायचं आहे त्यांना हा व्हिडीओ पाठवता येऊ शकतो.व्हाउचर मिळवण्यासाठी युझर्सना आरला पहिला रिचार्ज 199 किंवा 249 रूपयांचं करावं लागेल. त्यानंतर त्यांना रेफरल कोड शेअर करावा लागेल. सिम कार्ड अॅक्टिव्हेट झाल्यानंतर ग्राहकांना FRIEND असं टाईप

करून 7977479774 या क्रमांकावर Whatsapp करावं लागेल. त्यानंतर 3 दिवसांच्या आत रेफररचा मोबाईल क्रमांक शेअर करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फोनमध्ये व्हाउचर्स दिसतील. ही व्हाउचर्स MyJIO अॅपद्वारेही क्लेम करू शकता.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!