Friday, December 3, 2021

आमदार निलेश लंके भडकले, म्हणाले, सत्तेचा माज आलाय काय?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर

यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. टीकेची झोड उठल्यानंतर आता चंद्रकांत पाटील बॅकफूटवर आले आहेत.दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याने

राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध करत बोलताना जरा भान बाळगण्याचा सल्ला दिला आहे.शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. देशावर आणि राज्यावर आलेल्या

 प्रत्येक संकटसमयी शरद पवार धावून गेले आहेत. मग गुजरातमधील भूकंप असो, किल्लारीचा भूकंप असो, कोल्हपूर सांगलीला आलेला महापूर असो… प्रत्येकवेळी शरद पवार मदतीसाठी पुढे गेले.देशाच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, देशाचं राजकारण नेहमी त्यांच्याभोवती फिरत राहतं.

मग अशा नेत्याविषयी बोलताना जरासं भान बाळगावं, असा सल्ला निलेश लंके यांंनी चंद्रकांतदादांनी दिला. तसंच चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला.

मी अनावधानाने जो उल्लेख झालेला आहे, त्याबद्दल काही लोक बोलत आहेत. हे राष्ट्रवादीच्या पे रोलवर आहेत. त्यांना ते म्हणावंच लागतं. माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच आहे. अश्या प्रकारे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ माणसाचा अनादर करणं आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवलेले नाही,” असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!