Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यातील या आमदारांच्या जीवनावर येतोय पिक्चर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आमदार नीलेश लंके यांच्या जीवनावर येणाऱ्या चित्रपटाची घोषणा रविवारी ( ता. 24 ) दुपारी 2 वाजता पिंपळनेर येथे होणार आहे. पारनेर तालुका ही सेनापती बापट ( पांडुरंग महादेव बापट), संत निळोबाराय, ज्येष्ठ

समाजसेवक अण्णा हजारे अश्या थोर महापुरुषांची कर्मभूमी आहे. याच तालुक्यातील हंगा या छोट्याश्या गावात शिक्षकाच्या घरात जन्मलेले आमदार नीलेश लंके यांचा जन्म झाला. शिवसेनेत त्यांनी कार्यकर्ता ते तालुका प्रमुख असा राजकीय व सामाजिक प्रवास केला.

त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या समर्थकांनी नीलेश लंके यांना शिवसेनेचे विधानसभेचे तिकीट मिळावे याची मागणी केली होती. मात्र ही मागणी पूर्ण होत नव्हती.कार्यकर्त्यांची वाढती नाराजी पाहून त्यांनी एक सभा घेतली.

या सभेत त्यांनी शिवसेना सोडणार असल्याचे जाहीर केले होते. नीलेश लंके यांचा जनसंपर्क पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या प्रयत्नाने लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. मात्र विधानसभा निवडणूक

लढविण्यासाठी लंकेंकडे पैसेही नव्हते. जनतेने लोकवर्गणी गोळाकरून लंके यांना 60 हजार मताधिक्याने विधान सभेत पाठवले.कोरोना लॉकडाऊनमध्ये घरी निघालेल्या परप्रांतियांना नीलेश लंके यांनी माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात दिला.

कोरोना संकट काळात देशातील सर्वात मोठे कोविड सेंटर उभे करून 30 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनातून वाचविले. त्यामुळे त्यांचा सर्वदूर नावलौकिक झाला. जनतेचे केव्हाही कधीही एका फोनवर प्रश्न सोडवणाऱ्या या नेत्याच्या जीवनावर चित्रपट

यावा ही अनेक कार्यकर्त्यांची आणि पारनेरच्या जनतेची इच्छा होती.राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी नीलेश लंके विखेंच्या शिवारात आमदार नीलेश लंके यांच्या निकटवर्तीय असलेले लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे आमदार लंके यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचे काम हाती घेतले आहे.

इरोळे यांनी नीलेश लंके यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर 2 वर्ष अभ्यास करून फिल्मसाठी स्टोरी पूर्ण केली आणि चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार भूमिका करणार असून चित्रपटाचे गाणे रेकॉर्डिंग जवळपास पूर्ण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्रीमान योगी या शिवचरित्र ग्रंथाचे 5 दिवस पारायण करून 24 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता या चित्रपटाच्या कथानकाचे पूजन आणि नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!