माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यासाठी आज कोकणच्या खेडमध्ये सभा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री माजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली होती. याच मैदानावरून आताउद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनीती शिंदे गटाची आहे. आता याच वरून, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री
उदय सामंत यांनी पक्षप्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे १३ ते १४ आमदार शिंदेंच्या गटात येणार असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. ‘कोकण, पश्चिम
महाराष्ट्र तसेच विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार एवढं नक्की, असा मोठा दावा सामंत यांनी केला आहे. ‘कोण कोण आमदार आमच्याकडे प्रवेश करणार, ते त्या आमदारांना आणि मुख्यमंत्री
शिंदेंना यांनाच माहिती आहे, असे म्हणत त्यांनी सूचकपणे विरोधकांना खिंडार पडणार असल्याचे सांगितले.५ तारखेला सभा ही सभा नव्हती. त्यामध्ये फक्त शिव्या होत्या. कुणी कुणाला लांडगा तर कुणी कोल्हा म्हणत होता. इकडे काही लोकांचं म्हणण
आहे की, भाजपकडे वॉशिंग मशिन आहे. मग विचार बदलणारं मशिन कोणाकडे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजच्या सभेतून विकासाची दिशा स्पष्ट होईल, असेच भाषण मुख्यमंत्र्यांचं असेल, असे सामंत म्हणाले.
आजची सभा काही प्रत्युत्तर देण्यासाठी नाही. ५ तारखेच्या सभेत ठाकरेंनी सांगितले की, माझ्याकडे द्यायला काहीच नाही. मात्र आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच यावर बोलतील. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मी भरभरून
देणारा आहे. जे जे काही कोकणाला देण्यालसारखं आहे. आणि त्याचीच उधळण मुख्यमंत्री शिंदे आजच्या सभेत करतील. आमचे हात रिकामे आहेत, तरीही तुम्ही सोबत राहिलात, अशी सहानुभूती मिळवणारे
भाषण शिंदे करणार नाहीत, असा ही टोला सामंत यांनी लगावला.