Saturday, September 23, 2023

कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; चार परदेशी महिलांसह सातजणी ताब्यात 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरेगाव पार्क भागातील मसाज सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी केलेल्या

कारवाईत मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सात जणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या चालकांच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रस्त्यावरील एका सोसायटीत द सिग्नेचर थाई स्पा या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. मसाज सेंटरमध्ये परदेशी महिला असल्याची माहिती सामाजिक

सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली आणि मसाज सेंटरवर छापा टाकला.पोलिसांनी थायलंडमधील चार महिलांसह सात जणींना

ताब्यात घेतले. मसाज सेंटरचा व्यवस्थापक उत्तम शेषराव सोनकांबळे (वय ३८ रा. खराडी) आणि चालक गजानन दत्तात्रय आडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोनकांबळेला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरमधील

महिला आणि व्यवस्थापक आडे यांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!