Monday, December 6, 2021

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर त्याच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील विकास कामे मार्गी लावू. भाजप सरकार असताना आ. बबनराव पाचपुते व माजी मंत्री राम शिंदे पालकमंत्री असतान

त्यांनी पूर्णतः मतदारसंघात लक्ष देऊन मतदार संघाचा विकास केला. मात्र, सध्याचे पालकमंत्री शोधून सापडत नाहीत. त्यांचा शोध घेण्याची वेळ आली असल्याची टीका हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

राज्यात आघाडी सरकारने एकही काम केले नाही. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, बंधारे तुटली, शेतीचे नुकसान झाले, विजेचे पोल वाकले. मात्र या सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. डिपी जळाली तर जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत

डीपी चालू केली जात नाही. तसेच या सरकारच्या काळात सिंगल फेज बंद करण्याचे काम करण्यात आल्याची टीका कर्डिले यांनी केली. दरम्यान, पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करण्याचे संकेत यावेळी माजी आ. कर्डिले यांनी दिले.

महाराष्ट्रात महाआघाडी सरकार आल्यापासून एकही ठोस स्वरुपाचे काम दिसून येत नाही. भाजपच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. तर दुसरीकडे ज्या कामाचे उद्घाटन हे सरकार करत आहे, ते भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेले आहे.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!