Monday, December 6, 2021

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,राम शिंदे असे अनेक दिग्गज आहे. दरम्यान आता नगर जिल्ह्यात काही निवडणूक होऊ घातलेल्या आहे.यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.आगामी नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरपालिका ताब्यात

घेेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापासूनच ‘फिल्डींग’ लावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिकेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादीकडेच रहावी म्हणून वरिष्ठ पातळीपासून प्रयत्न सुरु आहेत.

यासाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना गळ घातली जात आहे. तसा निरोपही शरद पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत श्री. मुरकुटे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे. मात्र मुरकुटे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या निवडणुकीत ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ या भूमिकेतून माजी आ.मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँगेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनुराधा आदिक यांना ताकद दिली. त्यामुळे नगराध्यक्षपदाची माळ आदिक यांच्या गळ्यात पडली. मात्र पालिकेतील निर्णयात माजी आ. मुरकुटे यांचे शब्द डावलले जावू लागल्याने

ही आदिक-मुरकुटे युती अल्पकाळाची ठरली. आता काहीही झाले तरी गेल्या वेळी केलेली चूक पुन्हा करायची नाही असा निश्चय माजी आ. मुरकुटे यांनी केला असताना नगरपालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मुरकुटेंनी मदत केली पाहिजे असा आग्रह

श्रीरामपूरच्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्याकडे धरला आहे. या पार्श्वभूममीवर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन मुरकुटेंना राष्ट्रवादीबरोबरच राहून काम करावे, असा निरोप पाठविण्याची जबाबदारी ना. अजित पवार यांच्यावर सोपविली. त्यानुसार अजित पवार स्वतः भ्रमणध्वनीवर

 स्वतः श्री. मुरकुटे यांच्याशी बोलले आहे.मात्र पालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्टवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना डावलून पक्षाच्या एबी फॉर्म वर ताबा मिळविला.

त्यामुळे आदिक-मुरकुटे संबधात वादाची ठिणगी पडली. हा वाद दिवसेंदिवस वाढत गेला. दुसरीकडे पारंपारिक विरोधक असलेल्या ससाणे गटाशी मुरकुटे यांची जवळीक वाढत गेली. आता पालिका निवडणुकीत मुरकुटे-ससाणे युतीची चर्चाही श्रीरामपूरच्या राजकीय

वर्तुळात सुरु असताना पवारांकडून राष्ट्रवादीचे निमंत्रण आले आहे. पण गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे आता मुरकुटे काय भूमिका घेतात? हे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...
error: Content is protected !!