माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना पुन्हा डोके वर काढले आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. देशात १२९ दिवसानंतर एका दिवसांत कोरोनाचे
एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णानंतर देशातील आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आज रविवारी
सकाळी ८ वाजेपर्यंत देशात गेल्या २४ तासांत १०७१ रुग्ण आढळले. त्यामुळे देशात सध्या ५,९१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ५,३०,९०२ इतकी झाली आहे.देशात कोरोना विषाणूमुळे राजस्थान आणि महाराष्ट्रात एक-एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर केरळमध्येही एकाचा कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची
बाधा झालेल्या संख्या ४,४६, ९५,४२० इतकी झाली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.९ टक्के झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूने बाधित झालेल्या
नागरिकांची संख्या ४,४१,५८,७०३ इतकी झाली. सध्या देशात कोरोनाचा मृत्यू दर १.१९ टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत २२०.६५ कोटी जणांचे लसीकरण झाले आहे.कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने देशभरात
मोठा हाहाकार माजला आहे. कोरोनाचा XBB.1.16 व्हेरिएंट कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. INSACOGने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरिएंची एकूण 76 प्रकरणे
भारतात आढळून आली आहेत. या व्हेरिएंची सर्वाधिक प्रकरणे कर्नाटकात आढळून आली आहे.