Monday, December 6, 2021

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता पोटात भीतीचा गोळा निर्माण करणारी एक बातमी समोर येत आहे.

कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचं संकट आलं आहे.कोंबड्या नवा व्हायरस पसरवू शकतात . सध्या पोल्ट्री फार्ममध्ये अत्यंत घातक असे आठ विषाणू पसरत असल्याचं सांगितलं जात आहे. त्या विषाणूंचा फैलाव झाला, तर त्याचे परिणाम कोरोनापेक्षाही भयंकर असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी रशियात लाखो कोंबड्या अचानक मेल्या होत्या. त्या कोंबड्यांना एव्हियन फ्लूचा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे कोंबड्या मेल्यानंतर ती पोल्ट्री बंद करण्यात आली होती. हा एव्हियन फ्लू माणसांमध्येही वेगाने फैलावतो.

एव्हियन फ्लूच्या त्या स्ट्रेनला H5N8 असं नाव देण्यात आलं होतं. त्या पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही या स्ट्रेनचा संसर्ग झाला. त्यानंतर बघता बघता तिथल्या आणखी सात कर्मचाऱ्यांनाही एव्हियन फ्लूची लागण झाली. त्यांच्यामध्ये रोगाची लक्षणं सौम्य होती आणि ते उपचारांनंतर बरेही झाले.

मात्र विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकाच वेळी 9 लाख कोंबड्या माराव्या लागल्या होत्या. त्या कोंबड्या पुरवठासाखळीत आल्या असत्या, तर त्यांच्या माध्यमातून एव्हियन फ्लूचा संसर्ग बराच पसरला असता.

रशियातल्या या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली होती. मात्र त्या वेळी जागतिक आरोग्य संघटना कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात व्यग्र होती. आता रशियन फेडरेशनच्या चीफ कंझ्युमर अॅडव्हायझर अॅना पोपोव्हा यांनी सांगितलं की,

जगभरातल्या शास्त्रज्ञांनी लवकरात लवकर H5N8 विषाणूविरोधातलं इंजेक्शन विकसित करण्यासाठी एकत्र यायला हवं. तसं झालं नाही आणि हा विषाणू माणसात पसरू लागला तर परिस्थिती कोरोना संसर्गापेक्षाही अधिक बिकट होईल. आतापर्यंत एव्हियन फ्लूच्या आठ व्हेरिएंट्सचा शोध लागला असून, हे सगळे व्हेरिएंट्स माणसासाठी प्राणघातक ठरू शकतात.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!