Monday, December 6, 2021

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही.

त्यामुळे भाजप नेत्यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते.आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटूंबांत ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची

फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.पाचपुते पुढे म्हणाले, राज्यातील 55 लाख हेक्टर शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे.

प्रत्यक्षात शंभर लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत. शिवाय पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नसताना ठाकरे सरकार हेक्टरी 10 हजार

रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडीदेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला आहे. आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

त्यांनी सांगितले, की या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार आहे. मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारलाजरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!