Monday, December 6, 2021

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात आहेत आणि तशी कल्पना त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्याची चर्चा आहे.

 मुश्रीफ केवळ दोन वर्षांसाठीच पालकमंत्री पद घेणार असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलं होतं. त्यामुळे पालकमंत्री पद सोडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर

पालकमंत्री पद सोडत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान नगर हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुश्रीफ यांच्याकडे नगरच्या पालकमंत्रीपदाची सुत्रे सोपवून गटा-तटाच्या राजकारणातून वाट काढली होती. मात्र मुश्रीफांचे नगरमध्ये मन न रमणे राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादीसाठीच

धोक्याच ठरू पाहत आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात पालकमंत्री बदलाच्या चर्चा अनेकदा झडल्या. मात्र यावेळी स्थिती वेगळी आहे. स्वतः मुश्रीफ आता हे पद सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे म्हटले जात आहे. तशी इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे.

पुढील आठवड्यातच याबाबत निर्णय होईल, असेही सांगीतले जात आहे.दरम्यान, पालकमंत्री पदाचा बदल घडलाच तर त्यांच्या जागी कोण, प्रश्नही चर्चेत आला असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अलिकडे जिल्ह्याच्या राजकारणात

 आक्रमक झालेल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची पक्ष वर्तुळात चर्चा आहे.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!