Sunday, June 4, 2023

ठरलं: नेवासा मतदारसंघात पुन्हा गडाख विरुद्ध मुरकुटे लढत ?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज: आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या भाजपाने मोठी रणनीती आखली आहे त्यात नगर

जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ह्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील आमदार शंकरराव गडाख यांच्याविरोधात तगडा उमेदवार म्हणून श्रीरामपूरची माजी आमदार

भानुदास मुरकुटे यांचे नाव पुढे आले आहे जिल्हा बँक अध्यक्षपदी निवडणूक पासून मुरकुटे व विखे पाटील यांची जमलेली सूत पाहता ह्या चर्चेला उधाण आले आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार

भानुदास मुरकुटे एका गाडीतून फिरलेले होते. त्यावेळी लोकांची सहमत एक्सप्रेस पुन्हा धावणार असे बोलले जात होते. दरम्यान काही दिवसापूर्वीच अहमदनगर जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी

घडल्या त्याची केंद्रबिंदू श्रीरामपूर म्हणजे मुरकुटे ठरले.जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असताना भाजपाच्या माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बाजी मारली या निवडणुकीनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी आमदार

भानुदास मुरकुटे यांनी मुंबईत बंद खोलीत ताजबंद तासभर चर्चा करून सोबत स्नेहभोजनही केले. ह्या सर्व घडामोडीत तालुक्याच्या पूर्व भागातील मुरकुटे समर्थक व विखे निष्ठ कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली या भेटीदरम्यान नामदार विखे

यांनी श्री मुरकुटे यांनी सरळ भाजपात येण्याची ऑफर देत आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघात उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याचे समजते.दरम्यान याबाबत श्री मुरकुटे यांच्याशी संपर्क साधला असता बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर

नामदार विखे यांनी जेवणाची निमंत्रण दिले त्यामुळे आम्ही एकत्र जेवण केले मात्र भाजपा जाण्याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नाही घेतल्यावर सांगू असे सांगून त्यांनी बोलण्याची टाळले.नेवासा विधानसभा मतदारसंघात आमदार शंकरराव गडाख यांचे

विरोधात तगडा उमेदवारांच्या भाजप शोधात असून या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार मुरकुटे यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे

.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!