माय महाराष्ट्र न्यूज:पाटणा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रविवारी
सकाळी पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवरील डझनभर टीव्ही स्क्रीनवर अचानक अश्लील चित्रपट सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. प्लॅटफॉर्मवर महिला आणि पुरूष आपल्या लहानग्यांना घेऊन ट्रेनची
वाट पाहत उभे होते, मात्र अचानक ही घटना घडली अन् प्रवासी संतप्त झाले. याबाबत तक्रार करण्यात आली. मग आरपीएफने तात्काळ फोन करून संबंधित एजन्सीला अश्लील व्हिडीओ बंद करण्यास सांगितले.
याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.माहितीनुसार, जवळपास तीन मिनिटे अश्लील चित्रपटाचा व्हिडीओ चालू असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडून जाहिरात
एजन्सीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच डीआरएम प्रभात कुमार यांनी एजन्सीला दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर करार देखील रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.पाटना जंक्शनच्या जवळपास सर्व प्लॅटफॉर्मवर डझनभर
टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना ट्रेनची माहिती देता येईल. रविवारी घडलेली ही घटना काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. त्यावेळी अधिकाऱ्यांना
नंतर कळले. मात्र यावेळी माहिती मिळताच रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे