नेवासा
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे त्वरीत पिक पंचनामे करण्याचे आदेश करण्यात यावेत तसेच सन २०२२ व २०२३ पिक अतिवृष्टी शासकीय नुकसान व विमा कंपनी यांची रक्कम त्वरीत शेतकन्याच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने केली आहे.
नेवासाचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,नेवासा तालुका हा अतिवृष्टी बाधीत तालुका जाहीर झालेला असून सदरची माहिती महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत महसुल खात्या मार्फ़त प्रसिध्दी केलेली आहे. सध्याच्या नेवासा तालुकयात अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे शेती पिक झोडपुन निघल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले असुन शेतकऱ्यांनी पिक लागवडीसाठी विविध वित्तीय संस्थेचे कर्ज घेतलेले असुन शेतकऱ्यांना १०१ जप्तीची नोटीस वित्तीय संस्था शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होऊन तालुक्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्वभाविकच सदरच्या वित्तीय सं शेतकऱ्यांना वसुलीचा तगादा लावत असुन तसेच नविन वित्तीय पुरवठा केला जात नाही. शासन धोरण ठरवून ‘देखील आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने जाहिर केल्याप्रमाणे प्रति हेक्टरी १३,६०० रुपये या जिरायत जमिनीसाठी व प्रति हेक्टरी २७ ००० रुपये हे बागायत जमिनीसाठी व फळबागसाठी ३६,००० रुपये नुकसान भरपाई जाहिर करून देखिल सदरच्या रकमा शेतकयांच्या खात्यावर जमा झालेल्या नुसन शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाने व केंद्र शासनाच्या धोरणानुसार पिक विमा संरक्षण योजना लागू करण्यासाठी कुठलीही जाचक व व शती शिथील करून विमा रक्कमांच्या बँक खात्यात जमा करावी. त्या माध्यमातून यांनी पिक विमा हप्त्यापोटी त्यांच्या हिस्स्याची विमा रक्कम भरलेली असून तरी देखील विमा कंपन सदरची नुकसान भरपाई अदा केलेली नाही व ते मिळवण्यासठी संघर्ष करावा लागत आहे. वास्तवि घटना पाहता सदरच्या विमा कंपन्या या शासकीय धोरणानुसार पिक विम्याचे हप्ते राज्यशासन, केंद्रशासन व शेतकरी यांच्या कडून घेऊन दखिल बिमा रकमा शेतकन्यांच्या खात्यावर वर्ग करत नसुन मोठवा प्रमाणात अडचणी निर्माण करत आहे नेवासा तालुक्यात देखिल बन्याच शेतकऱ्यांचा विम्याच्या रकमा खात्यावर जमा झालेल्या नसल्याने
सध्याचे अवकाळी झालेल्या पावासाने शेती पिकाचे त्वरीत पंचनामे होण्याचे आदेश देण्यात यावेत व शासकीय सन २०२२ व २०२३ ची शासकीय अतिवृष्टी पिक नुकसान भरपाई त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग व्हावी अशी मागणी केली आहे.
सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकन्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा ही विनंती.
निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिम्बक रघुनाथ भदगले,बाबासाहेब रामनाथ नागोडे,अशोक ज्ञानदेव नागोडे,नामदेव मच्छिंद्र बर्गे, भगवानराव शेषराव आगळे,
बाळासाहेब राजाराम सरोदे,
सौ. मिरा गुंजाळ,,महेंद्र भगवान आगळे, सतिश उत्तम आगळे यांच्या सहया आहेत.