माय महाराष्ट्र:जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत
झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी 28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला होता.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी
आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांना सरकारने पाठवलेल्या नोटीसा मागे घेणार असल्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर राहावं. सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असं आवाहनही काटकर यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे.
बैठकीतील निर्णय
>> जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील तफावत ठेवणार नाही.
>> जुनी पेन्शन योजना सारखी आर्थिक लाभ देण्यात येणार.
>> शासनाने तत्वत धोरण स्वीकारले.
>> सरकार लेखी हे संघटनेला देणार