Friday, July 1, 2022

.. तर नगर जिल्ह्यात राजकीय भूकंपाचीही शक्यता ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर विधान परिषद निवडणूक नोव्हेंबर- डिसेंबर महिन्याच्या दरम्यान होणार आहे.महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अरुणकाका जगताप आणि चंद्रशेखर घुले यांची नावे चर्चेत आहेत .

तर भाजपाकडून माजी आमदार कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शालिनीताई विखे पाटील यांची नावे चर्चेत आहेत . विधानपरिषद मतदारांवर वरकरणी महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसत आहे.पण विद्यमान आमदार

अरुणकाका जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी टाळल्यास भाजपा कर्डिलेंना पुढे करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कर्डिले यांची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

नगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणूकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महानगर पालिका आणि नगरपालिका नगरसेवक मिळून 398 पैकी आजमितीला 396 पात्र मतदार आहेत.

विधान परिषदेसाठी राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सरळ लढत होणार आहे.आजमितीला राष्ट्रवादीकडून आमदार अरुणकाका जगताप विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या दोन टर्म कालावधी

झाल्याने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी म्हणून राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव चर्चेत आहे.महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असल्याने मतदारांवर महाविकास आघाडीचे प्राबल्य दिसून येत आहे.

पण विद्यमान आमदार अरुणकाका जगताप यांना उमेदवारी टाळल्यास त्यांचेच व्याही आणि राष्ट्रवादीचे नगर शहर मतदार संघाचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना रणांगणात उतरविण्याचे तयारी भाजपाने सुरू केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघासाठी सर्वाधिक 73 मते ही अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात आहेत.त्यावर वरकरणी कोणाचे आणि अंतर्गत कोणाचे वर्चस्व आहे हे सर्वश्रुत आहे. त्या खालोखाल राहता, शिर्डी नगरपालिका आणि राहता

जिल्हा परिषद मिळून 45 मते असून त्या बरोबरीचे 42 मते ही संगमनेर नगर पालिका आणि जिल्हा परिषद मध्ये आहेत.या ठिकाणी भाजपा आणि महाविकास आघाडी बरोबरीत राहू शकते. राहुरी तालुक्यात राहुरी जिल्हा परिषद आणि नगर पालिके

मध्ये राज्यमंत्री तनपुरे गटाचे वर्चस्व आहे तर देवळाली प्रवरा नगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे.कोपरगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे तर नगर पालिकेत भाजपाचे वर्चस्व आहे.श्रीरामपूर मध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद मिळून 41 मतदार आहेत. या भागात विखे कुटुंबीयांचा राजकीय दबदबा,

ससाणे गट आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे या दोन्ही गटाशी ऋणानुबंध कर्डिलेंना फायदेशीर ठरणार आहेत.नेवासा मधील 27 मतदारांवर नामदार शंकरराव गडाख यांचे तर पाथर्डी मधील 25 मतदारांवर आमदार मोनिका राजळे यांचे वर्चस्व आहे.श्रीगोंदा मध्ये नगर पालिका आणि जिल्हा परिषद मिळून 28 मते आहेत.

त्यात आमदार बबनराव पाचपुते हे भाजपाचे तर माजी आमदार राहुल जगताप व कर्डिले यांचे राजकीय सख्य सगळ्यांना माहिती आहे.त्याचप्रमाणे शेवगाव 5, अकोले 6, नगर तालुका 7, कर्जत 4 , जामखेड 3 आणि पारनेर येथील 6 मतांचाही समावेश आहे.

अकोलेमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड हे सध्या भाजपा मध्ये असून सहकारी बँक राजकारणामुळे माजी चेअरमन सीताराम गायकर यांचे आणि कर्डिले यांचे संबंध ही चांगले आहेत.

पारनेरमध्येही कर्डिलेंना चांगली साथ मिळू शकते.त्यातच विद्यमान आमदार अरुणकाका जगताप यांना जर उमेदवारी टाळली तर त्यांची आणि जावई आमदार संग्राम जगताप यांची कर्डीले यांना मोठी मदत मिळणार आहे.त्यामुळे भाजपा ही कर्डिले यांनी उमेदवारी करावी

यासाठी आग्रह धरत आहे. जिल्ह्यातील 396 मतदार आणि महाविकास आघाडी आणि भाजपा यांची मतांची बेरीज आणि वजाबाकी पाहिल्यास अखेरच्या टप्प्यात निवडणूक ही अहमदनगर महानगरपालिका मतदारांभोवती फिरणार आहे. महानगर पालिका

मतदारांवर ज्यांचे वर्चस्व राहील त्या गटाला निवडणूक विजयी करणार आहे. माजी आमदार कर्डिले हे फोडाफोडीच्या राजकारणातील बादशहा मानले जातात. साम, दाम,दंड आणि भेद ही नीती कुठे आणि कशी वापरायची याची त्यांना पुरेपूर माहिती आहे. मागील 2 वेळा अरुणकाका जगताप यांच्या विधान परिषद

निवडणुकीत कर्डिले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.कर्डिले यांची रणनितीला खासदार डॉ.सुजय विखे यांची प्रामाणिक साथ मिळाल्यास कर्डिले यांची उमेदवारी मतदारांवर वर्चस्व असतानाही राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार कर्डिले राष्ट्रवादीच्या संपर्कात असून विधान परिषदेचे उमेदवार असतील अशीही चर्चा आहे. जर आमदार अरुण जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली तर जगताप गट नाराज होऊ शकतो.त्याचा परिणाम नगर शहराच्या राजकारणावर आणि विधान परिषदेतही होऊ शकतो.

पण कर्डिले यांनाच राष्ट्रवादीमध्ये घेऊन उमेदवारी दिल्यास जगताप गट शांत होऊ शकतो, राज्यमंत्री तनपुरे यांच्यासमोरील अडथळा दूर होऊ शकतो आणि पारनेर ,श्रीगोंदा , राहुरी विधानसभा मतदार संघात फायदा होण्याबरोबच भाजपला मोठा धक्का बसून खासदार सुजय विखे यांच्यासमोरील

अडचणीत वाढ होऊ शकते.त्यामुळे कर्डिले हे राष्ट्रवादी मध्ये जाऊन उमेदवारी करतील त्याबदल्यात बाजार समितीवरील चौकशीचे विघ्नही दूर होईल आणि जगताप गटही शांत राहील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!