Saturday, June 10, 2023

सावधान:पतीला सांगू नयेत ह्या गोष्टी अन्यथा..

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:नवरा बायको हे दोन संसाराची महत्वाची चाके आहेत, मात्र चाणक्य नीतीमध्ये अश्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या बायकोने

चुकूनही आपल्या नवऱ्याला सांगू नये. तसे जर केले तर तुमच्या सुखी जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. चाणक्य बोलतात लग्नानंतर माहेरच्या गोष्टी सासरच्या लोकांना आणि सासरच्या

लोकांबद्दल वाईट माहेरी कधीच बोलू नये. यामुळे दोन्ही कुटुंबात एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. याचे पडसाद नवरा – बायकोच्या नात्यात पडू शकतात आणि वैवाहिक जीवनामध्ये

कटुता येते.केलेल्या दानाचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळत नाही. म्हणजेच केलेली मदत कधीच कोणाला बोलून दाखवू नका, त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो.

बायकोने जर कोणाला सहाय्य केले असेल, तर ते कधीच आपल्या नवऱ्याला सांगू नका. चाणक्य नीती नुसार पत्नीने पतीचे किंवा स्वतःच्या कमाईचा काही भाग बचत करायला हवी, आणि याबद्दल पतीला

सांगू नये. कारण हे पैसे भविष्यात कुटुंबाच्या अडचणीच्या वेळी कामी येऊ शकतात. जर असे केले नाही तर पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होऊन जाईल. पत्नींनी आपल्या पतीची तुलना इतर पुरुषांशी

कधीही करू नये. चाणक्य सांगतात की असे केल्याने पतीचा मान-सन्मान दुखावतो आणि वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो. ही गोष्ट पतीलासुद्धा लागू होते.चाणक्याच्या मते, पती-पत्नी दोघांनी ही एकमेकांचा सन्मान

केला पाहिजे. एकमेकांशी नम्र वागून मन जिंकता येते. वादविवाद टाळण्यासाठी एकमेकांशी सभ्यपणे वागा. चाणक्य सांगतात की रागावर नियंत्रण ठेवल्यास वैवाहिक जीवन यशस्वी होते. जेव्हा एखादी

व्यक्ती रागावते तेव्हा तो चांगले आणि वाईट यात फरक करू शकत नाही. अशावेळी नात्यात कटुता येऊ शकते

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!